---Advertisement---
जळगाव जिल्हा

खुशखबर! भुसावळमार्गे धावणाऱ्या 38 एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढणार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२४ । रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असून यात सामान्य श्रेणी डब्यांमध्ये तर प्रचंड गर्दी असते. सामान्य श्रेणीतील प्रवाशांची जागेची अडचण सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सामान्य डब्यांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने भुसावळ मार्गे धावणाऱ्या ३८ रेल्वे गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढवली आहे. यामुळे सर्वसामान्य श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

General Coach Train jpg webp

यापैकी १४ गाड्यांना प्रत्येकी दोन, तर २४ गाड्यांना प्रत्येकी एक डबा वाढेल. या गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टळण्यास मदत होईल. साधारणतः नोव्हेंबरपासून ही सुविधा मिळेल. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार १४ गाड्यांना जनरलचे प्रत्येकी दोन डबे वाढवले जातील.

---Advertisement---

त्यांची नावे अनुक्रमे मुंबई गोंदिया, एलटीटी बनारस एक्स्प्रेस, एलटीटी-पाटलीपुत्र, एलटीटी – शालीमार, एलटीटी-हावडा एक्स्प्रेस, एलटीटी-पुरी, मुंबई-नागपूर- मुंबई सेवाग्राम, हावडा- मुंबई – हावडा मेल, हावडा- मुंबई हावडा एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, हावडा मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, रांची हटिया-पुणे एक्स्प्रेस अशी आहेत.

याशिवाय २४ प्रवासी गाड्यांना प्रत्येक एक जनरल डबा वाढीव लागणार आहे. त्यांची नावे अनुक्रमे मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस, एलटीटी अयोध्या एक्स्प्रेस, एलटीटी- बलिया एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी जयनगर, एलटीटी-बल्लारशाह, एलटीटी-छपरा एक्स्प्रेस, एलटीटी गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-सुलतानपूर, एलटीटी-अयोध्या, एलटीटी-अयोध्या, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी-गोरखपूर, एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी – सीतापूर प्रतापगड, एलटीटी आग्रा कॅट, एलटीटी राणी कमलापती – एक्स्प्रेस, पुणे दानापूर पुणे एक्स्प्रेस, मुंबई अमरावती मुंबई एक्स्प्रेस, पुणे काजीपेठ पुणे एक्स्प्रेस, पुणे- लखनौ पुणे एक्स्प्रेस, पुणे जसडीह पुणे एक्सप्रेस, पुणे – लखनौ पुणे एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांची जागेची समस्या सुटेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---