निंभोरी येथे कुंभमेळा शाहीस्नानासाठी गायत्री परिवाराचा अभिनव उपक्रम

मार्च 8, 2021 3:26 PM

 

gayatri family for kumbh mela shahisnana

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । यावर्षी हरिद्वार येथे कुंभमेळा होत आहे. यानिमित्ताने भाविकांना घरीच शाहीस्नानाचा लाभ मिळावा.  म्हणून निंभोरी (ता. पाचोरा) येथे कार्यक्रम संपन्न झाला.

यात जेथे जेथे गायत्री परिवाराचे केंद्र आहे, त्या परिसरातील शहरी व ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी  २४ घरी जाऊन त्या – त्या घरी हरिद्वार येथील गंगाजल व सोबतच वेदमाता श्री. गायत्री प. पु. गुरुदेव व वंदनीय माताजी यांचे छायाचित्र असलेला एक फोटो वितरित केला जात आहे.

Advertisements

गंगाजल व फोटोची देवघरात स्थापना करून शाहीस्नान तिथीला त्या गंगाजलातील दोन थेंब बादलीभर पाण्यात टाकून भाविकांना स्नान करता येणार आहे. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी भक्तिभावाने प्रतिसाद दिला. यावेळी विजया मोराणकर, आश्लेषा निगडे, प्रणिता येवले, सिंधुताई पाटील, मंगला पाटे, मालती अमृतकर, लता ठाकरे, रजनी परदेशी, सुभद्रा परदेशी, नलिनी भावसार, संगिता पाटील सह गायत्री परिवार पाचोरा च्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now