⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

दिवाळीपूर्वी महागाईचा धक्का!! एलपीजी सिलिंडरच्या दरात झाली एवढ्या रुपयांची वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज : 1 नोव्हेंबर 2023 : सणासुदीच्या काळात तेल कंपन्यांनी जनतेला महागाईचा झटका दिला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 1 नोव्हेंबरला गॅस सिलिंडरच्या किमती 103 रुपयांनी वाढवल्या.याआधी ऑक्‍टोबरमध्ये तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. मात्र ही वाढ व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत झाली आहे. तर घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

राजधानी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 101.50 रुपयांनी वाढल्या आहेत. यानंतर येथील व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1785.50 रुपये झाली आहे. जे ऑक्टोबरमध्ये 1684 रुपयांना उपलब्ध होते.

घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर
तेल कंपन्यांनी 1 नोव्हेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. सध्या घरगुती गॅस सिलिंडर जुन्या किमतीतच मिळतील.जळगावमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 908 ते 909 रुपयाला मिळत आहे.तसेच देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये, दिल्लीमध्ये 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर 903 रुपयांना उपलब्ध आहे. तर मुंबई आणि कोलकाता येथे त्याची किंमत अनुक्रमे 902.50 रुपये आणि 929 रुपये प्रति सिलेंडर आहे. तर चेन्नईमध्ये घरगुती स्वयंपाकघरातील सिलिंडर 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.