⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

खुशखबर! गॅस सिलिंडर 172 रुपयांनी झाला स्वस्त, नवीन दर तपासून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२३ । मागील काही काळात गॅस सिलेंडर दरात प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडून गेलं आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज सकाळी जाहीर झालेल्या दरानुसार एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 172 रुपयांनी कपात केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

नवे दर आज १ मेपासून लागू
दिल्लीत पूर्वी 2028 रुपयांना व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होता, आता तो 1856.50 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये 2132 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 1960.50 रुपयांना मिळणार आहे.

मुंबई आणि चेन्नईचे दर
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर आधी हा सिलेंडर 1980 रुपयांचा होता, तो आता 1808.50 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 2192.50 रुपयांच्या सिलेंडरसाठी आता 2021.50 रुपये मोजावे लागतील. तेल विपणन कंपन्यांकडून एटीएफची किंमत 2415.25 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात किमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात विमान भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.