⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

खुशखबर! जूनच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर स्वस्त, आजपासून नवीन दर लागू..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ०१ जून २०२४ | महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. आज १ जूनपासून देशभरात एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहेत. ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे.

आईल कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. मात्र, घरगुती गॅस सिलिंडर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय.

IOCL च्या वेबसाइटनुसार 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले आहे. हे दर आज 1 जूनपासून नव्याने लागू केले आहे.सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. आईल

आता नवीन दर असे
IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किंमती अपडेट केल्या गेल्या आहेत. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1745.50 रुपयांऐवजी आता 1676 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1859 रुपयांऐवजी 1787 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1698.50 रुपयांना विकला जात होता, तो आता 1629 रुपयांवर आला आहे. तर चेन्नईमध्ये 1911 रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत 1840.50 रुपयांवर आली आहे.

घरगुती सिलेंडरचे दर असे
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल आणि बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत 802.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत आहे. यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने 14.2 किलोच्या घरगुती