⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | गॅस सिलेंडरचा स्फोटात उसतोड मजुराच्या घराला आग

गॅस सिलेंडरचा स्फोटात उसतोड मजुराच्या घराला आग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२ । सांगवी ता. चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथे एका ऊसतोड मजुराच्या घरात अचानक गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात त्याच्या घरातील रोकडसह एकूण तीन लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला. या स्फोटात जीवितहानी झाली नसली तरी उसतोड मजुराचे मोठे नुकसान झाले आहे. दामु फंदु राठोड असे ऊसतोड मजूराचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील दामु फंदु राठोड हा ऊसतोड मजूर आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित असतो . त्यांच्या पत्नी सकाळी ९ वाजताच्या सुमारास स्वयंपाक करीत असताना अचानक गॅसचा स्फोट झाला. यामुले त्याचे घरातील संसार उपयोगी वस्तूंसह ५ ग्रॅम सोने, बाजरीचे धान्य, बैलांची विक्री करून कपाटात ठेवलेले १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेचा पंचनामा करण्यात आले आहे. तत्पूर्वी राठोड कुटुंबाचे संसार पूर्णतः उद्धवस्त झाला आहे. यामुळे पिडीतांचे जगणे असाह्य झाले आहे. मदतीची आस धरून बसलेल्या या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीने मिळेल का?

author avatar
टीम जळगाव लाईव्ह