⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलेल्यांची संपूर्ण यादी…

ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलेल्यांची संपूर्ण यादी…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94वा ॲकॅडमी पुरस्कार सोहळा 27 मार्च रोजी पार पडला. कोरोना महामारीनंतर तीन वर्षांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक कलाकारांनी अत्यंत आकर्षक पोशाखात उपस्थिती लावली. ॲमी शूमर, रेजिना हॉल आणि वांडा सायकस यांनी या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.

‘द पॉवर ऑफ द डॉग’ या चित्रपटाला यावेळी सर्वाधिक 12 नामांकनं मिळाली होती. त्यानंतर ‘ड्युन’ला10, बेलफास्ट आणि वेस्ट साईड स्टोरीला सात नामांकनं मिळाली. विल स्मिथच्या किंग रिचर्ड या चित्रपटाला सहा नामांकनं मिळाली होती. जगभरात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात कोणी बाजी मारली ते पाहुयात..

सर्वोत्कृष्ट चित्रपट- कोडा (CODA)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- जेसिका चेस्टेन, द आईज ऑफ टॅमी फाये (The Eyes of Tammy Faye)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- विल स्मिथ, किंग रिचर्ड (King Richard)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- जेन कॅम्पियन, द पॉवर ऑफ द डॉग (The Power of the Dog)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं- नो टाइम टू डाय, नो टाइम टू डाय (No Time to Die) बिली एलिश आणि फिनिज ओकॉनेल यांनी दिलं संगीत
सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर- समर ऑफ सोल Summer of Soul (…Or, When the Revolution could not be televised)
सर्वोत्कृष्ट अडाप्टेड स्क्रिनप्ले – शियान हेडर (CODA)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्क्रिनप्ले- केनेथ ब्रनाघ लिखित बेलफास्ट (Belfast)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझाइन- जेनी बीवन (क्रुएला)
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर- ड्राइव्ह माय कार (जपान)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- ॲरिएना डीबोस, वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ट्रॉय कोत्सुर (CODA)
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर- एन्कँटो (Encanto)
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर- हान्स झिमर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेजर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स- ड्युन, पॉल लॅम्बर्ट, त्रिस्टान माइल्स, ब्रियान कॉनर, गर्ड नेफ्झर (Dune)
सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग- जो वॉकर, ड्युन (Dune)
सर्वोत्कृष्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मांगिनी, थिओ ग्रीन, डग हेम्फिल, रॉन बार्लेट (Dune)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मिट, शुशाना सिपॉस (Dune)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग- द आइज ऑफ टॅमी फाये, लिंडा डॉड्स, स्टेफनी इन्ग्राम, जस्टीन राले (The Eyes of Tammy Faye)
सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट- द लाँग गुडबाय (The Long Goodbye)
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड शॉर्ट- द विंडशिल्ड पायपर (The Windshield Piper)
सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट- द क्वीन ऑफ बास्केटबॉल (The Queen of Basketball)

author avatar
टीम जळगाव लाईव्ह