⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | ZP Election : आम्ही सत्तेसाठी राजकारण करत नाही तर आमच्या कामामुळे भाजपची सत्ता येते – आ.राजूमामा भोळे

ZP Election : आम्ही सत्तेसाठी राजकारण करत नाही तर आमच्या कामामुळे भाजपची सत्ता येते – आ.राजूमामा भोळे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | भारतीय जनता पक्ष हा जनतेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच जनतेच्या विकासासाठी राजकारण करतो. या [भाजपच्या विकासाच्या राजकारणा वरच विश्वास ठेवत जळगाव जिल्ह्यातील जनता भारतीय जनता पक्षाला इतके वर्ष जिल्हा परिषदेची सत्ता देत आहे. यावेळी हि विजय आमचाच होणार असा आम्हाला विश्‍वास आहे. अशी प्रतिक्रिया आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी ‘जळगाव लाईव्ह’शी बोलताना दिली.

१५ दिवसाच्या आत निवडणुका जाहीर करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आणि जिल्हा परिषदेत मध्ये निवडणुकांची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी महाविकासआघाडी व्हावी ही शिवसेनेची इच्छा आहे तर आम्हाला अजून पर्यंत कोणीही प्रस्ताव दिलेला नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी जळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले होते. आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव लाईफ शी बोलताना सांगितले की आम्ही सत्तेसाठी कधीही राजकारण केले नाही जो आमच्या सोबत येतो त्याला आम्ही घेऊन चालतो आणि विरोधात येतो त्याचा विरोध करतो. पण जनतेच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष राजकारण करत असते. भारतीय जनता पक्षाने कधीही सत्तेसाठी राजकारण केलेला नाही. आणि यंदाही विकासाचा मॉडेल घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत.

तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याने भाजपाची ओबीसी बाबतची भूमिका काय आहे? ही आ.भोळे यांना विचारली असता त्यांनी सांगितले की, ओबीसी आरक्षण हे या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गेले आहे. मात्र भारतीय जनता पक्ष ओबीसींवर अन्याय करणार नाही. जसे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आम्ही वेळोवेळी त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये राखीव ठेवलेल्या जागा देणारच आहोत. यामुळे जरी महाविकास आघाडीने किंबहुना राज्य सरकारने ओबीसींवर अन्याय केला असला तरी आम्ही ओबीसींवर अन्याय करणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून ते आमचे महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस ते जळगाव जिल्हा परिषद आम्ही प्रत्येक निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच लढली. यापुढेही आम्ही विकाच्या मॉडेलचा पुढे घेऊन आमची रणनीती आखणार आहोत. आणि पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील जनता जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा झेंडा फडकवणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह