जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) उद्यापासून म्हणजे 15 मार्चपासून इयत्ता 10वीच्या परीक्षा घेणार आहे. लाखो उमेदवारांना या परीक्षेला बसावे लागते. यासाठीचे प्रवेशपत्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर आधीच जारी करण्यात आले आहे. परीक्षेला बसण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हे नियम सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावेत.
SSC परीक्षा 2022 ही 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळच्या पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून बहुतांश परीक्षा सुरू होतील. उर्वरित पेपर दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी ३ वाजल्यापासून घेण्यात येतील. परीक्षेदरम्यान कोविड प्रोटोकॉलची काळजी घेतली जाईल.
या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील
परीक्षेला बसण्यासाठी प्रवेशपत्र सोबत ठेवावे लागेल. प्रवेशपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
कोविड प्रोटोकॉलचे पालन अनिवार्यपणे करावे लागेल. यासोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे.