जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । गेल्या काही दिवसांपासून शिवसेमध्ये काही आलबेल नाही असे चित्र समोर येताना दिसत आहे. कारण शिवसेनेच्या मेळाव्याला महापौर, उपमहापौर, मनपा विरोधी पक्षनेते, गटनेत्यांसह इतर नगरसेवकांनी दांडी मारली होती. मात्र आता ठाकरे गटाचे मनपातील गटनेते अनंत (बंटी)जोशी यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे राजकारण चांगलच तापलेल पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील नाराजीची चर्चा आहे. त्यात काही नगरसेवक ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहेत. त्यातच ठाकरे गटाचे मनपातील गटनेते अनंत जोशी यांनी केलेल्या पोस्टमुळे चर्चा अजूनच वाढल्या आहेत.
अनंत जोशी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये माजी महापौर नितीन लढ्ढा व माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे एकमेकांचे हात हातात घेत असल्याचा फोटो टाकला आहे. त्याच फोटोमध्ये मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे लढ्ढा व सोनवणे यांच्या मधोमध बसले आहेत. मात्र, ते दोघांपैकी कोणालाच हात देत नसल्याचे दिसून येत आहेत.
अश्यावेळी नक्की कोण कोणत्या पक्षात जाणार हे नक्की सांगता येत नाही. असेही म्हटले जात आहे. मात्र मी तुझ्या आणि तुम माझ्या पक्षात असेही होऊ शकते अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या सर्व चर्चा केवळ विनोदी अंगाने सुरु आहेत. जोशी यांनी हा फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवर टाकला असून, त्यांनी या फोटोला ‘नवीन घडत आहे काही, जस्ट वेट…’ हे कॅप्शन दिले आहे.