जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दि १४ व १५ ऑक्टोंबर तज्ञांची टीम करणार तपासणी व शस्त्रक्रिया

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा.व रूग्णालयातर्फे दि १४ व १५ आक्टोबर दोन दिवस मोफत उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तज्ञांची टीम तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत.

शिबिरात जनरल मेडीसिन विभागात दारूमूळे होणारे लिव्हरचे ,पोटाचे व अन्ननलिकेचे आजार तसेच शुगर, पॅरालेसिस, फुफुस्स लिव्हर,किडनी, ब्रेन हॅमरेज तसेच अ‍ॅनिमीया रूग्णांची तपासणी केली जाणार आहे तर शल्यचिकीत्सा विभागात, अस्थीरोग, बालरोग, जनरल सर्जरी, कँन्सर आजारांच्या रूग्णांची तपासणी केली जाणार आहे.या शिबिराकरीता सुसज्ज ओपीडी, वार्ड आणि ऑपरेशन थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर २५ मेडीसिन व शल्यचिकीत्साची टीम तैनात करण्यात आली

ज्या रूग्णांना पुढील उपचाराची गरज भासणार आहे अशा रूग्णांना ताबडतोब रूग्णालयात अ‍ॅडमिट करून घेतले जाणार आहे. रूग्णांनी येतांना आजाराबाबतचे जूने रिपोर्ट तसेच आधार कार्ड, रेशन कार्ड देखिल सोबत आणावयाचे आहे. सोमवार व मंगळवार असे फक्‍त दोन दिवस हे शिबिर चालणार असून रूग्णांनी अधिक माहितीसाठी मनिषा खरात याचेंशी ८६६८२१४४९४ या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन रूग्णालयामार्फत करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button