⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोफत रेशन घेणाऱ्यांनो.. तुमची ‘ही’ एक चूक कुटुंबासाठी पडू शकते महागात, ‘हा’ नियम जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२३ । केंद्र सरकारने 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना सुरू केली होती. आता सरकारने ही योजना ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. जर तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण करू शकते. नेमकं काय हे जाणून घेऊयात..

सर्वप्रथम, हे लक्षात घेतले पाहिजे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत ते मोफत रेशनचा लाभ घेऊ शकत नाहीत. तुमच्याकडे चारचाकी असेल आणि तुम्ही त्याचा गैरफायदा घेत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

मोफत रेशन घेण्याचा हा नियम आहे
दुसऱ्या नियमानुसार, तुमच्या उत्पन्नातून मिळालेला 100 चौरस मीटरचा भूखंड, घर किंवा फ्लॅट असेल, तरीही तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेऊ शकत नाही. तिसरा नियम असा आहे की तुम्ही खेडेगावात राहत असलात आणि तुमचे उत्पन्न वार्षिक 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असले तरीही तुम्ही मोफत रेशन योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. शहराच्या बाबतीत वार्षिक उत्पन्न रु.3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे. गावात ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि ज्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे त्यांनाही मोफत रेशन घेता येत नाही.