⁠ 
सोमवार, जानेवारी 13, 2025
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पीजी महाविद्यालयात विनामूल्य भव्य आरोग्य शिबिर संपन्न

पीजी महाविद्यालयात विनामूल्य भव्य आरोग्य शिबिर संपन्न 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२२ । के. सी. ई सोसायटीच्या  ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त के. सी.ई च्या पी. जी. महाविद्यालयात भव्य आरोग्य शिबिर नुकतेच पार पडले. हे शिबिर पी. जी. महाविद्यालय व  इव्हेंट मॅनेजमेंट विभाग, मू जे. (स्वायत्त) महाविद्यालय यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित करण्यात आले  होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य एस. एन. भारंबे   यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन के.सी.ई. सोसायटीचे संचालक डॉ. हर्षवर्धन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंचावर  महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एस. झोपे, जळगाव जिल्ह्यातील नामवंत डॉ. तेजस राणे (एम. डी. मेडिसिन) डॉ. पंकज महाजन (एम. डी. मेडिसिन)  डॉ. हेमांगी कोल्हे (स्त्री रोग तज्ञ)  डॉ.रुपाली बेंडाळे (स्त्री रोग तज्ञ) डॉ. वैशाली सरोदे   (त्वचारोग तज्ञ)  डॉ.चंदन महाजन  (त्वचारोग तज्ञ)  डॉ.दीप्ती मुळीक (नेत्ररोग तज्ञ)  डॉ.रश्मी सरोदे  (नेत्ररोग तज्ञ)   उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संदीप पाटील यांनी केले. शिबिराला जळगाव जिल्ह्यातील अकरा  विविध चिकित्सा क्षेत्रात काम करणारे अनुभवी,नामवंत आणि दिग्गज, तज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचा लाभ नऊशे हून अधिक मु.जे.महाविद्यालय, पी. जी. महाविद्याल, अध्यापक महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल ,मुलींचे वसतिगृह  येथील  विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय लोहार यांनी केले. या शिबिरासाठी इव्हेंट मॅनेजमेंट विभागाचे प्रा. पंकज कासार, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह