---Advertisement---
गुन्हे पाचोरा

तरुणाला दिले नोकरीचे आमिष, सव्वा पाच लाखात दोघांनी गंडविले

---Advertisement---

Pachora News जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार नित्याचेच आहेत. गेल्याच आठवड्यात जळगावातील एका तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला होता. सोमवारी पाचोरा पोलिसात देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवकाला शिपाई पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वारंवार पैशांची मागणी करत ५ लाख २५ हजार रुपयात गंडविण्याची घटना घडली आहे. आपली (Fraud) फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच युवकाने दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

Fraud 1 jpg webp

पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील रहिवासी असलेल्या गणेश मोतीलाल गढरी (वय 32) यांना शिपाई पदावर नोकरी लावून देतो असे सांगत चुलत मामा जगन गंगाराम पवार (रा. मोहलाई, ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांचे परिचयातील सागर रतन बागुल (रा. एकलहरे, ता. जि. नाशिक) व एस. पी. बोडखे (रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे) यांचेशी ओळख करुन दिली. नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत सागर बागुल याने दि. १९ मार्च २०२१ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधीत गणेशकडून वेळोवेळी फोन पे द्वारे ५ लाख २५ हजार रुपये घेतले.

---Advertisement---

पैसे दिल्यानंतर देखील काम होणं नसल्याने गणेश गढरी यांनी सागर बागुल व एस. पी. बोडखे यांना नियमित फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सागर बागुल यांचा मोबाईल बंद तर एस. पी. बोडखे हे ठराविक कालावधीत मागून पैसे देतो, असे सांगत वेळ मारुन नेत होते. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने गणेश गढरी यांनी सोमवार दि.२३ रोजी पाचोरा पोलीस स्टेशन गाठत सागर बागुल व एस. पी. बोडखे यांचे विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे‌. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---