---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

भंगाळे गोल्डचे लाखोंचे सोने घेऊन बंगाली कारागिराची धूम, विश्वास संपादन करून केली फसवणूक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । जळगाव शहर सोन्याची मोठी बाजारपेठ असून दररोज करोडोंची उलाढाल होत असते. सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणारे अनेक दुकान असले तरी दागिने घडविणारे बहुतांश कारागीर बंगाली आहे. अनेक कारागीर जुने जळगाव, शनिपेठ परिसरात वास्तव्याला आहे. शहरातील राजकमल टॉकीजजवळ असलेली प्रसिद्ध सराफ पेढी भंगाळे गोल्डने दागिने तयार करण्यासाठी एका बंगाली कारागिराला सोने दिले होती.गेल्या चार वर्षांपासून तो दागिने तयार करून देत असल्याने संस्थेचा त्याच्यावर विश्वास बसला होता. सराफपिढीने दिलेले १४ लाख ११ हजार ६४९ रुपयांचे सोने घेऊन कारागिराने परतच न देता फसवणूक केली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

b g gold chori

जळगाव शहरातील सराफ बाजार आणि विविध सराफ पेढ्या सोन्याच्या शुद्धता आणि गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. जळगावातील बहुतांश सोने पेढीतील दागिने तयार करण्याचे काम बंगाली कारागीर करतात. शनिपेठ, रथ चौक, जुने जळगाव परिसरात मोठ्याप्रमाणात राहतात. जळगावातील नामांकित सराफ पेढी भंगाळे गोल्डमधील दागिने घडविण्याचे काम अस्ता तारक रॉय रा. मातोश्री बिल्डींग शनीपेठ जळगाव मुळ रा. पश्चिम बंगाल हा करीत होता. गेल्या चार वर्षापासून तो काम पाहत असल्याने त्याच्यावर पेढीचा विश्वास बसला होता. दागिने घडविण्यासाठी दिलेल्या सोन्यातून तो दागिने तयार करून आणून देत होता.

---Advertisement---

भंगाळे गोल्डचे आकाश भागवत भंगाळे रा.ओंकार नगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.३१ मार्च ते १ जून दरम्यान अस्ता रॉय याने वेळोवेळी २४ कॅरेट वेगवेगळ्या वजनाचे दागिने घेऊन जात काही दागिने दुकानावर जमा केले होते. अगोदर दिलेले २५१.८५९ मिलिग्रॅम, तसेच दि. २५ रोजी रिपेअरिंगसाठी दिलेले २१.४१० मिलीग्रॅम वजनाचे दागिने असे एकूण २७३.२६९ ग्रॅम वजनाचे १४ लाख ११ हजार ६४९ किमतीचा ऐवज कारागिराने फसवणूकीच्या इराद्याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---