ब्लॉकमुळे भुसावळ विभागातील चार गाड्या रद्द, तीन गाड्या विलंबाने धावणार

ऑगस्ट 14, 2025 12:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ – बडनेरा खंडात आज १४ रोजी वाहतूक ब्लॉक घेतला आहे. त्यात शेगाव ते श्री क्षेत्र नागझिरी आणि पारस दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याची कामे होतील. ब्लॉकमुळे या मार्गावरील चार गाड्या रद्द, तर तीन नियोजित वेळेपेक्षा विलंबाने सुटतील. एका गाडीच्या वेळेत बदल केला आहे.

train 1 jpg webp

रेल्वे प्रशासनाने गुरुवारी घेतलेल्या ब्लॉकमुळे भुसावळकडून बडनेऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम होईल. मात्र, रेल्वेच्या पायाभूत सुविधा उन्नत करणे आणि प्रवासी सुरक्षेसाठी हे काम आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.ब्लॉकमुळे १११२१ भुसावळ ते वर्धा मेमू ही गाडी भुसावळ येथून दुपारी २.२५ ऐवजी ३.१५ वाजता सुटेल. तर ११०४० गोंदिया कोल्हापूर एक्स्प्रेस विभागात २ तास विलंबाने धावेल. १२४८५ हुजूर साहीब नांदेड श्री गंगानगर एक्स्प्रेस विभागात १ तास १० मिनिटे विलंबाने येईल. तर २०८२० ओखा पुरी एक्सप्रेस सुद्धा २ तास थांबवण्यात येणार आहे.

Advertisements

१४ ऑगस्टला रद्द केलेल्या गाड्या
६११०९ भुसावळ ते बडनेरा मेमू, ६११०२ बडनेरा ते भुसावळ मेमू, ६१११५ बडनेरा ते अमरावती मेमू, ६१११६ अमरावती ते बडनेरा मेमूया चार गाड्या ब्लॉकमुळे रद्द कराव्या लागल्या. याचा सर्वाधिक त्रास स्थानिक चाकरमान्यांना होईल.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now