---Advertisement---
जळगाव जिल्हा

भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; या चार गाड्या रद्द

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील काझीपेठ – विजयवाडा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. याचा थेट परिणाम भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार रेल्वे गाड्या रद्द, तर चार गाड्यांचे मार्ग बदलात झाला आहे. यामुळे चार महिन्यांपूर्वी आरक्षण केलेल्या प्रवाशांचे हाल होतील.

train jpg webp

ब्लॉकच्या काळात गाडी क्र.२०८२० ओखा – पुरी एक्स्प्रेस १ ते १५ मे पर्यंत वर्धा – नागपूर रायपूर तिटीलागढ रायगड विजियानगरम खुर्दा रोडमार्गे वळवली आहे. ही गाडी चंद्रपूर, बल्हारशाह, सिरपूर कागजनगर, मंचिरयाल, रामागुंडम, वारंगल, विजयवाडा, एलुरु, राजमुंद्री, समलकोट, अनाकपल्ले व विशाखापट्टणम स्थानकांवर जाणार नाही. गाडी क्र. २०८१९ पुरी ओखा एक्स्प्रेस २८ एप्रिल व ५, १९ मे रोजी खुर्द रोड, विजयानगरम, रायगड, तिटीलागढ, रायपूर, नागपूर व वर्धा मार्गे वळवली आहे.

---Advertisement---

गाडी क्र. २०८०३ विशाखापट्टणम गांधीधाम एक्सप्रेस २ ते १६ मे दरम्यान विशाखापट्टणम, विजियानगरम, रायगड, तिटीलागड, रायपूर, नागपूर, वर्धा मार्गे वळवली आहे. ही गाडी समलकोट, राजमुंद्री, एलुरु, विजयवाडा, वारंगल, रामागुंडम, मंचिरयाल, सिरपूर कागजनगर, बल्हारशाह व चंद्रपूर स्टेशनवर जाणार नाही. २०८०४ गांधीधाम एक्स्प्रेस २८ एप्रिल व ५, १९ मे रोजी वर्धा, नागपूर, रायपूर, तिटीलागढ, रायगढ, विशाखापट्टणम मार्गे वळवली जाईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---