दिवसाढवळ्या दुचाकी लंपास करणाऱ्यांचा टोळीचा पर्दाफाश; ३ दुचाकींसह चौघे जेरबंद

फेब्रुवारी 14, 2026 5:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून याच दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिसांनी दुचाकी लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींसह चोरीची दुचाकी विकत घेणाऱ्या एकाला, अशा एकूण ४ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ९०,००० रुपये किमतीच्या ३ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईने दुचाकी चोरांमध्ये खळबळ उडाली.

dc

नेमके प्रकरण काय?
गेल्या ८ जानेवारी २०२६ रोजी दरेगाव आणि बरखेड परिसरातून दोन दुचाकी दिवसाढवळ्या चोरी गेल्याप्ररकणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांनतर प्रभारी अधिकारी सपोनि प्रवीण दातरे यांनी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आधी दडू संजय सोनवणे (१९, रा. दरेगाव, ता. मालेगाव) याला मालेगावातून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या.

Advertisements

या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू असतानाच, सुलतान सलीम शाह (३४, रा. दहिवेल, ता. साक्री) हा मुख्य संशयित निष्पन्न झाला. पोलिसांनी ११ फेब्रुवारी रोजी त्याला दहिवेल येथून अटक करून ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळवली. कसून चौकशी केली असता त्याने चोरीची गाडी विलास दत्तु पिंपळसे (३०, रा. औदाणे, ता. सटाणा) याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने औदाणे गाठून विलास पिंपळसेला अटक केली आणि त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची ‘हिरो एचएफ डिलक्स’ गाडी हस्तगत केली.

Advertisements

तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली की, दादू सोनवणे, भगवान उर्फ लंगड्या करंगळ आणि सुलतान शाह या तिघांनी मिळून चाळीसगाव तालुक्यात संघटितपणे दुचाकी चोरीचे सत्र राबवले होते. त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची दखल घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२ अन्वये ‘छोटे संघटित गुन्हे’ म्हणून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now