एरंडोलगुन्हे

पिंपळकोठाजवळ भीषण अपघात, चौघे जागीच ठार, एक जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चौघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघात इतका भीषण होता की मयतांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक एमएम १९ सीझेड ७३६० ने पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांमध्ये विजय सिंग हरी परदेशी ६५ वर्ष, आबा रामचंद्र पाटील वडजी ५५ वर्ष, विजय हरिसिंग परदेशी, तुषार(जयदीप) मदन सिंग राजपूत ३७ वर्ष यांचा समावेश असून रायसिंग पदमसिंग परदेशी हे जखमी असल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मयत जयदिप हा एरंडोल येथील माजी मुख्याध्यापक एम.झेड परदेशी यांचा मुलगा असुन तो एरंडोल ग्रामीण रूग्णालयात फार्मासीस्ट या पदावर कार्यरत होता.

अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून बाहेर काढण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातामुळे सुमारे १ तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पाळधी येथील वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील,अनिल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी वाहतुक सुरळीत केली.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button