गुन्हेयावल

यावल तालुक्यात आत्महत्येचा प्रयत्न करणारे तिघे सुदैवाने बचावले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२१ । अलीकडच्या काळात या न त्या कारणाने वाढलेल्या आत्महत्या चिंतेचा विषय बनल्या असतांनाच असाच प्रकार तालुक्यात दोन जणांची आत्महत्येचा प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचविण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पाटचारीत पडलेल्या एका तरुणास वाचविण्यात यश आले असल्यामुळेया अनोख्या योगायोगाची चर्चा सुरू आहे.

याबाबात मिळालेले वृत्त असे की, यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत आत्महत्येचा प्रयत्न करणार;या तिघांचे प्राण वाचविण्यात ग्रामीण रुग्णालयास यश आले आहे.तर एकाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत तर एक ग्रामीण रुग्णालयात दाखल असून एकास पुढील उपचारासाठी भुसावळ येथे रवाना करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद आबिद सय्यद सगीर (वय. ३२.रा. आझाद नगर, यावल) हा तरुण दुपारी घरापासून तीन किलोमीटर लांब असलेल्या हतनूर पाटचारीकडे फिरायला गेला होता. तो पाय घसरून पाटचरित पडला. त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास पुढील उचारासाठी भुसावळ येथे खासगी दवखान्यात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, आज तालुक्यात दोन आत्महत्येचे प्रयत्न झाले. यातील एका घटनेत आजाराला कंटाळून नीता विनोद कासार (वय ४०, रा. मेन रोड, यावल) या महिलेने आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तील पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर उपचार करून तीस घरी सोडण्यात आले आहे. तर तिसऱ्या घटनेत ज्योती देवचंद भालेराव (वय ४८, रा. थोरगव्हाण ता. यावल) या महिलेने राहत्या घरी आर्थिक अडचणीना कंटाळून विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, डॉ. शिवम तिळके , आरोग्य सेविका ज्योत्स्ना निंबाळकर यांनी तिघांवर उपचार केलेत. त्यांच्या प्रयत्नांनी आज तिघांचे प्राण वाचले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button