जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्तीला सहकार विभागाने मान्यता दिली आहे. माजी आ.दिलीप वाघ यांची मुख्य प्रशासकपदी वर्णी लागली असून इतर ७ सदस्यांचा समावेश आहे.
प्रशासकीय मंडळात यांचा आहे समावेश
अॅड. अभय शरद पाटील, शिवाजी दौलत पाटील, युवराज रामसिंग पाटील, चंद्रकांत धनवडे, रणजीत अभिमन्यू पाटील, अनिल बाबूलाल महाजन यांचा प्रशासक म्हणून यात समावेश आहे.