मध्यप्रदेशच्या माजी शिक्षणमंत्री अर्चना चिटणीस यांच्याकडून डॉ. पाटील परिवाराचे सांत्वन

सप्टेंबर 12, 2025 7:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी परिवाराच्या प्रेरणास्थान असलेल्या स्व. गोदावरी पाटील यांच्या निधनानंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील आणि परिवाराचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सांत्वन केले जात आहे.

up

राज्यातील मंत्र्यांकडूनही डॉ. पाटील परिवाराविषयी सहवेदना व्यक्त केल्या जात आहे. गुरूवारी मध्यप्रदेश राज्याच्या माजी शिक्षणमंत्री अर्चना चिटणीस यांनी जळगाव येथे डॉ. उल्हास पाटील यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी परिवारातील डॉ. केतकी पाटील व सदस्य उपस्थित होते.

अर्चना चिटणीस आणि डॉ. उल्हास पाटील यांचे अत्यंत कौटुंबिक संबंध असल्याने सौ. चिटणीस यांनी स्व. गोदावरी आईंच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी देखिल डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now