जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजनांच्या कारचा भीषण अपघात

जानेवारी 22, 2026 11:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या माजी महापौर आणि भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन आणि त्यांचे पती नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारचा अपघात झाला. नाशिक विभागीय आयुक्तांकडे भाजप नगरसेवकांची गट नोंदणी करून परत येत असताना हा अपघात मालेगावजवळ झाला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालंबाल बचावले.

jayashree mahajan

याबाबत असे की, जळगाव महानगरपालिकेत निवडून आलेले भाजपचे सर्व ४६ नगरसेवक बुधवारी गट नोंदणीसाठी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यामध्ये महाजन दाम्पत्याचाही समावेश होता. गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून परतीच्या प्रवासात मालेगावच्या अलीकडे भरधाव वेगाने जात असताना समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार (क्रमांक एम.एच. ५२ बी ०९९९) थेट समोरील वाहनावर आदळली.

Advertisements

अपघाताच्या वेळी कारमधील सर्व प्रवासी सीट बेल्ट लावलेले असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये जयश्री महाजन, सुनील महाजन यांच्यासह विनोद मराठे, ललित धांडे आदी पाच जण होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now