जळगाव जिल्हामुक्ताईनगर

व्याघ्र अधिवास क्षेत्र,डोलारखेडा जंगलातील अतिक्रमित मानव वस्तीचे वनविभागाकडुन मोजणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवास क्षेत्र, डोलारखेडा जंगलातील अतिक्रमित मानव वस्तीचे वनविभागाकडुन नुकतीच प्राथमिक मोजणी करण्यात आली. असून, येत्या दोन तीन दिवसात मोजणीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई होणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर बच्छाव यांंनी ‘जळगांव लाईव्ह’शी बोलतांना सांगितले.

सविस्तर असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवास क्षेत्र असलेल्या वडोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा नांदवेल दरम्यान, कुऱ्हा – मुक्ताईनगर रस्त्याच्या बाजूला जंगलात खाजगी शेती असुन, अंदाजे पाच एकर शेतीत मध्य प्रदेश येथील स्थलांतरित मजुर पावरी लोकांची ३५-४० कुटुंबाची मानवी वस्ती आठ-दहा वर्षापासून वसलेली आहे. सदर शेती वन हद्दीच्या मधोमध असुन, या वस्तीतील काही झोपड्या वन हद्दीमध्ये असल्याची तक्रार येथील जि. प. सदस्य निलेश पाटील व स्थानिक ग्रामस्थांची होती. तसेच या वस्ती शेजारील जंगल परिसरात अवैध वृक्षतोडीसह इतर अनेक समस्या निर्माण होऊन वनसंपदेचा ऱ्हास होत असल्याचे तसेच वन्य प्राण्यांच्या अधिवासास मानवी हस्तक्षेप होत असुन, वन्यप्राणी शेतीशिवाराची वाट धरताहेत परिणामी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.

संबधित पावरी वस्ती वनहद्दीत वाढत असल्याची तक्रार जि. प. सदस्य निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सुमारे वर्षभरापासून वनविभागाकडे तोंडी तक्रारी दिल्या तसेच गत काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी तसेच उपवनसंरक्षक जळगांव यांचेकडे निवेदने दिली. या तक्रारीची दखल घेत उपवनसंरक्षक विवेक होसिंग यांनी संबंधित ठिकाणी मोजणीचे आदेश दिले. वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर बच्छाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वनसर्वेक्षक चव्हाण व वाघ यांच्या मदतीने सदर वस्ती व शेताची प्राथमिक मोजणी केली. येत्या दोन तीन दिवसात मोजणीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई होणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर बच्छाव यांंनी ‘जळगांव लाईव्ह’शी बोलतांना सांगितले.

सदर जंगलात पट्टेदार वाघांचे अस्तित्व आहे. या वस्तीच्या अगदी जवळून वाघांचे येणे जाणे असते. शिवाय जवळच्या पाणवठ्यावर वाघाच्या पाणी पिण्याचे ट्रॅप कॅमऱ्यांत वेळोवेळी सिद्ध झाले आहे. तसेच शेजारील जंगल परीसर नष्ट होत असुन, वनविभागाकडुन दुर्लक्ष होत आल्यामुळे वस्ती झपाट्याने वाढली. याबाबत वनविभागाला गांभीर्य नसल्याचा आरोप जि. प. सदस्य निलेश पाटील यांचा आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button