धक्कादायक : गस्तीवर असणार्‍या वनरक्षकांच्या पथकावर परप्रांतीय शिकार्‍यांनी केला गोळीबार

एप्रिल 12, 2021 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । यावल तालुक्यातील करंजपाणी या दुर्गम भागात परप्रांतीय शिकार्‍यांनी गस्तीवर असणार्‍या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केला. दरम्यान,  वनरक्षकांकडे कुठलेही शस्त्र नसल्याने सर्वांनी झाडांच्या आडोसा घेवुन आपले जिव वाचविले.मात्र, या घडलेल्या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

crime

यावल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या करंजपाणी या परिमंडल कक्ष०३ क्रमांक १०४ मध्ये दिनांक ११एप्रिल रोजी दुपारी वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसार्ठ हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा, काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा, अश्रफ मुराद तडवी , वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र लंगडा आंबा क्षेत्रात गस्त घालत होते. त्या ठिकाणी १०ते १५ अज्ञात जणांचे टोळके दिसुन आले व त्या टोळक्यातील लोकांनी वनरक्षकांकडे पाहुन घटनास्थळापासुन पळ काढला. वनरक्षकांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता , त्या टोळक्यांकडे असलेल्या गावठी कट्टयाने त्यांच्या दिशेने दोन फैरी झाडल्या. त्या वेळेस वनरक्षकांकडे कुठलेही शस्त्र नसल्याने सर्वांनी झाडांच्या आडोसा घेवुन आपले जिव वाचविले.

Advertisements

दरम्यान, विजय गोरख शिरसाठ वनक्षक करंजपाणी यांनी अज्ञात शिकार्‍यांच्या विरोधात फिर्याद दिली. या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अंमलदार सुशिल घुगे, भुषण चव्हाण, असलम खान हे करीत आहेत. दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now