---Advertisement---
कोरोना जळगाव जिल्हा

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात आढळले आठ रुग्ण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । मागील काही महिण्यापासून आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा डोकं वर काढताना दिसतोय. जळगाव जिल्ह्यात कोरोना एक दिवसापूर्वी कोरोनाचे ८ रुग्ण आढळून आले होते. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असताना आज बुधवारी म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी कोरोना ८ रुग्णावर स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

corona jpg webp

देशात कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागली असून देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्र्रात आढळून येत आहे. यामुळे पुन्हा निर्बंध लागणार का? अशी चिंता सतावत आहे. गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत नव्हती. परंतु गेल्या काही दिवसापासून ती आढळून येत आहे.

---Advertisement---

काल मंगळवारी जिल्ह्यात ८ कोरोना बाधित रुग्ण होते. तर आज एकही रुग्ण बरा होऊन घरी गेलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५७८ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९६८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या १८ रुग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५९२ बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव शहरात-० , जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-३, अमळनेर-० , चोपडा-० , पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---