---Advertisement---
पाचोरा प्रशासन भडगाव

पाचोऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम, २०० हातगाड्या हटवल्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । सलग दुसऱ्या दिवशीही पाचोरा नगर परिषदेच्या दबंग महिला मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी भाजीपाला मार्केटमधील जवळपास २०० हातगाड्यांचे अतिक्रमण उठवून रस्ता मोकळा केल्याने शहरातील नागरीक व विशेषत: महिला वर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे. मात्र हे काहीदिवसां साठी नाही तर अतिक्रमण निर्मूलन हे कायम रहावे, अशी सर्व सामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अतिक्रमण

मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, राजीव गांधी टाऊन हॉल, जामनेर रोड, शिवाजी महाराज चौका परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, भुयारी मार्ग परिसरातील हातगाड्या, दुकानदारांनी लांबवलेले ओटे, शेठ जेसीबीने काढले. पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, गणेश चौबे, राहुल मोरे, पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सोबत घेत अतिक्रमण काढले जात आहे.

---Advertisement---

गेल्या अनेक वर्षांपासून राजीव गांधी टावून हॉल, जामनेर रोड, शिवाजी महाराज चौका जवळील परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, रेल्वे स्टेशन रोड, भुयारी मार्ग परिसरातील हातगाड्या, दुकानदारांनी लांबवलेले ओटे, शेठ हे जेसीबीने काढल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. दरम्यान, पाचोरा पालिकेने गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्याची धडक मोहिम राबवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी विरोध व किरकोळ वाद होत असून परिणामांची तमा न बाळगता मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी बेधडक कारवाई सुरू ठेवली आहे.

आज भडगावराेड परिसरातील अतिक्रमणांवर नजर
अतिक्रमण काढण्यासाठी उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, दगडू मराठे, साईदास जाधव, दत्तात्रय जाधव, मधू सूर्यवंशी, हेमंत क्षीरसागर, हिमांशू जैस्वाल, प्रकाश पवार, शाम ढवळे, शाम अहिरे, शरद घोडके, शरद अहिरे, अनिल पाटील, विजय बाविस्कर, विलास देवकर, पांडुरंग धनगर, बापू महाजन यांची मदत घेण्यात आली. बुधवारी सकाळी भडगाव रोड परिसरातील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिली.

हे देखील वाचा:

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---