⁠ 
शनिवार, मे 4, 2024

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ; कुठे कुठे पाऊस पडणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

कुठे कुठे पाऊस पडणार?

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 सप्टेंबर- राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला 19 सप्टेंबर रोजी पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

20 सप्टेंबर- पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया (यलो अलर्ट)

21 सप्टेंबर- पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड औ,रंगाबाद, जालना, बीड, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, , गोंदिया (यलो अलर्ट)

22 सप्टेंबर- 22 सप्टेंबर- पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली (यलो अलर्ट)

पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दहा दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि संपूर्ण मराठवड्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. आता पुन्हा मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.