⁠ 
शनिवार, मे 4, 2024

१० हजारांसाठी मित्रानेच केली हत्त्या, एलसीबीने आवळल्या एकाच्या मुसक्या

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । भादली येथील खुनाच्या प्ररकणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली असून आरोपीताने गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ईश्वर नथ्थु सपकाळे कानळदा ता. जि. जळगाव असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मयत सौरभ यशवंत चौधरी व त्याचा साथीदार ईश्वर नथ्थु सपकाळे हे नेहमी सोबत राहत असून साधारण ४ ते ५ दिवासापूर्वी या दोघांचा वाद झाला होता. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी पथकासह ईश्वर नथ्थू सपकाळे याचा शोध घेतला असता तो दि. ३ रोजी सकाळ पासून घरी नव्हता. त्यावेळी त्याचे घरच्यांना त्याबाबत विचारपुस केली असता तो कुठे गेला याबाबत सांगता येणार नाही असे सांगीतले. दरम्यान, आज रोजी दि. ६ रोजी कानळदा शिवारात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून आरोपी ईश्वर नथ्थ्य सपकाळे याने गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

यांनी केली अटक
पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह सपोनि जालींदर पळे, पोउपनिरी अमोल देवढे, सफी रवि नरवाडे, पोह संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव यांनी सदर संशयिताला अटक केली आहे.

खून केल्याची कबुली
आरोपी ईश्वर नथ्थ्य सपकाळे याने मयत सौरभ यशवंत चौधरी, रा दशरथ नगर जळगाव हा माझे कडून हात उसनवार पैसे घेतले होते. दि. २ रोजी ०९.३० वा चे सुमारास मोटार सायकल मी व मयत सौरभ चौधरी असे श्रीराम चौक जनाबाद येथून निघुन भादली येथील पाटचारी वर बसून गप्पा मारत असतांना मी मयत सौरभ चौधरी यास हातउसनवारीचे पैसे मागण्यास गेलो असता आमच्या दोघात वाद होवून भादली ता. जि. जळगाव येथील पाटचारी जवळ धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने त्यास मारून जिवेठार केल्याची कबुली दिली आहे.