जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । जळगाव शहरातील गोलाणी मार्केटच्या स्वच्छतागृहात अन्न शिजवले जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, गोलाणीतील काही व्यावसायिकांनी एकत्रित येत ‘त्या’ व्यक्तीची बाजू मांडली असून अतिक्रमणाचा भीतीपोटी आणि दोन दिवसांपूर्वी अचानक पाऊस आल्याने त्याने ते साहित्य त्याठिकाणी ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/139407958099329/
प्रसाधनगृहात आढळलेल्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी देखील त्यांनी प्रशासनाला केली आहे. महापौर आणि आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळून आल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. व्हिडीओ व्हायरल झालेला विक्रेता भीतीपोटी घरातून निघून गेला असून त्याने घरी परत यावे असे आवाहन व्यावसायिकांनी जळगाव लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/279675296901409