मुंबईहुन जळगावकडे येणारे विमान अचानक रद्द ; प्रवाशांमध्ये नाराजी

जुलै 19, 2025 8:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२५ । जळगाव विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र त्यातच विमानसेवा रद्द होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. अशातच मुंबई येथून जळगावकडे येणारे विमान शुक्रवारी अचानक रद्द करण्यात आले.

jalgaon airport jpg webp

या निर्णयामुळे जळगाव येथून मुंबईला प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. नियोजित वेळेत पोहोचण्याच्या अपेक्षेने प्रवासासाठी पोहोचलेल्या अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडले असून त्यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई, अहमदाबाद तसेच पुणे येथून जळगावसाठी सुरू असलेल्या विमानसेवा वारंवार अचानक रद्द होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. याबाबत जळगाव विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी यांनी देखील मुंबई येथून शुक्रवारी विमानसेवा रद्द होण्याबाबतचे विमान कंपनीकडून कोणतेही पूर्वसूचना आलेली नसल्याची माहिती दिली आहे. या प्रकारांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now