जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२४ । गाडीची काच पुसताना सोन्याचे ब्रेसलेट तिघांनी हातातून निसटलेले पाच तोळे प्रामाणिकपणे पोलिसांसमोर मूळ मालकाला परत केले. किशोर फकिरा चौधरी (रा. अंकलेश्वर, गुजरात) हे १२ रोजी दुपारी १२ वाजता मंगळ ग्रह मंदिरावर दर्शनासाठी आले होते. पार्किंगमध्ये गाडीची काच पुसताना त्यांच्या हातातून ५३ ग्रॅम सोन्याचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट हातातून पडले. ब्रेसलेट हरवल्याबाबत पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना माहिती दिली. त्यांनी तपासासाठी गणेश पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे या पोलिसांना पाठवले.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हे ब्रेसलेट चौघांना सापडल्याचे दिसून आले. त्यांनाही ते पितळेचे वाटल्याने त्यांनी ते गाडीत ठेवून दिले.
पोलिसांनी वाहनाचा नंबर शोधून मालकाचा शोध घेतला. त्या चौघांची नावे राहुल गजानन वाघ, रा. धोदत, छगन श्रावण मिस्तरी, रा. अंतुर्ली, उमेश नामदेव शेलार (रा. कनाशी), नितीन राजू वाडेकर (रा. भावेर) असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनाही ब्रेसलेट सोन्याचे आहे, हे समजल्यावर आश्चर्य वाटले. चौघांनी आम्हीच ब्रेसलेट अमळनेर पोलिस स्टेशनला आणून देतो, म्हणून सांगितले. पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी मालक किशोर चौधरी यांना बोलावून सुनील चौधरी यांच्यासमक्ष ते ब्रेसलेट परत केले.