जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 17 एप्रिल रोजी रात्री 10.30 सुमारास विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्याची कोविड टेस्ट घेण्यात आली. यात पाच नागरिक ‘पॉझिटीव्ह’सापडले नरगरिकांना वारंवार सांगून सुद्धा नागरिक शहरात विनाकारण अथवा खोटी कारणे सांगून फिरण्याचा प्रयत्न करत होते.
तसेच या प्रकरणी शहर पोलीस प्रशासन व नगर पालिका प्रशासन यांनी कारवाई केली आहे. यात दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच दोघं प्रशासनाने सामान्य नागरिकांना विन्नती अथवा ताकीद दिली आहे विनाकारण शहरात फिरून संचारबंदी मोडली तर दंडात्मक कारवाई होणार आहे.
यावेळी ‘पी आय’ किसनराव नजन पाटील , पी. एस. आय. नलवडे साहेब, चौबे साहेब, विकास पाटील साहेब, मोरे साहेब ‘ए. एस. आय’ सुनील पाटील प्रकाश पाटील, जगताप बापु महाजन विजयसिंग यांनी ही कारवाई केली.
यांनी घेतल्या टेस्ट-
आरोग्य सेविका भारती पाटील, व आकाश ठाकूर नगर पालिका कर्मचारी -प्रशांत कंडारे,अनिल वाघ, भिकन गायकवाड, प्रकाश फासे यांनी यावेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे घेतले टेस्ट.