---Advertisement---
गुन्हे रावेर

संतापजनक घटना : आधी वाढवली मैत्री मग त्याच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीशी मैत्री वाढवून नंतर तिच्यावर अनेकदा अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित शाहरूख सरवर तडवी (कोरपावली, ता.यावल) या तरुणाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 12 jpg webp webp

मैत्री वाढवून केला अत्याचार
रावेर तालुक्यातील एका गावातील 16 वर्ष सहा महिने वयाची अल्पवयीन तरुणी कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी संशयित शाहरूख सरवर तडवी (कोरपावली, ता.यावल) हा तरुणीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने तरुणीसोबत मैत्री केली व नंतर तिचा विश्वास संपादन करीत तिला लग्नाचे आमिष देत तीन ते चार वेळा रावेर तालुक्यातील एका गाातील शेतरस्त्यावर अत्याचार केला. पीडीतेने लग्नाची विचारणा करताना आरोपीने कानावर हात ठेवल्याने पीडीतेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने रावेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---