गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आविष्कारची प्रथम फेरी संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२४ । विद्यार्थ्यांमध्ये संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार या संशोधन स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अविष्कार २०२५ च्या प्रथम फेरीचे महाविद्यालय स्तरावर आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासोबत डॉक्टर हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉक्टर नितीन भोळे (प्रमुख बेसिक सायन्सेस अँड हुम्यानीटीज), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (प्रमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स), प्रा. महेश पाटील (प्रमुख, विद्युत विभाग), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख), कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नेमीचंद सैनी व प्रा. जयश्री पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. नेमीचंद सैनी (अविष्कार समन्वयक) यांनी विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेबाबत माहिती देताना वेगवेगळ्या स्तरावर ही स्पर्धा घेण्यात येते व विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिक राज्यस्तरीय स्तरावर दिले जाते. महेश एच.पाटील यांनी विद्यार्थ्यांना अविष्कार बद्दल माहिती सांगताना संशोधनाचे महत्त्व समजावून सांगितले व जास्तीत जास्त संख्येने आविष्कार मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधन करताना विद्यार्थी दशेत असताना संशोधनावर काम करणे, तसेच नवनवीन गोष्टी शिकणे गरजेचे ठरते, देशपातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन होत आहेत, अशा प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातूनच विद्यार्थी देशपातळीवरील स्पर्धांसाठी तयार होत असतात असेही त्यांनी नमूद केले. यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्टर्सचे सादरीकरण पर्यवेक्षकांसमोर केले.
पर्यवेक्षक म्हणून प्रा. महेश एच पाटील व प्रा. तुषार कोळी तसेच निरीक्षक म्हणून प्रा. अतुल बर्हाटे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाच्या समारोपा प्रसंगी प्रा. महेश एच पाटील व प्रा. तुषार कोळी यांनी पर्यवेक्षक म्हणून कार्यक्रमाबद्दल अभिप्राय दिला. व विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले. विजेता झालेल्या विद्यार्थ्यांची निवड पुढील झोनल स्पर्धेसाठी झाली. झोनल स्पर्धा ही दिनांक १० नोव्हेंबर २०२४ रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे होणार आहे.अविष्कार प्रथम फेरीचे विजेते ह्युमॅनिटीज लैंग्वेजेस अँड फाईन आर्ट्स १. अभिजीत पवार २. हिमांशू पाटील कॉमर्स मॅनेजमेंट लॉ१. जतीन भोळे प्युअर सायन्स १. प्रवीण पाटील २. सर्वेश पाटीलएग्रीकल्चर निमल हसबंडरी १. दुर्गेश सोनार इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी १. शुभम संदानशिव२. खगेश नारखेडेसदर कार्यक्रमाचे नियोजन विद्युत विभागाचे प्रा. नेमीचंद सैनी, प्रा. जयश्री पाटील यांनी प्रा. महेश पाटील तसेच डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य) व डॉ. वैभव पाटील सर (डी एम कार्डिओलॉजी) यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन महेश्री, प्रा. किशोर महाजन, प्रा. निलेश चौधरी, प्रा. व्ही डी चौधरी त्यांनी सहकार्य केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तुळजा महाजन व नयन ललवाणी या विद्यार्थिनींनी केले.