⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | पहिल्या पावसातच करंजी जि.प. शाळेतील पत्रे उडाल्याने शाळेची झाली दैयनीय अवस्था

पहिल्या पावसातच करंजी जि.प. शाळेतील पत्रे उडाल्याने शाळेची झाली दैयनीय अवस्था

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । यावल तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊसामुळे करंजी येथील जिल्हा परिषद शाळेतील पन्हाळी पत्रे उडाल्याने शाळेची दैयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या शिक्षण विभागाचे तात्काळ या वादळात नुकसान झालेल्या शाळांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.

३० मे २०२१ रोजी रविवारी सांयकाळी साडेसात वाजता तालुक्यात विविध ठीकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यात वादळीवाऱ्यामुळे प्रचंड प्रमाणात असल्यामुळे करंजी तालुका यावलच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील छतावरील पन्हाळी पत्रे हवेत उडाल्याने शाळेतील वर्ग खोल्या उघड्यावर पडुन यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानदानाचे साहीत्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात करंजी गावाच्या सरपंच सिंधुबाई सोनवणे यांच्यासह शाळेतील मुख्यंध्यापक भाग्यश्री बारेला, शितल पाटील, नंदकीशोर सोनवणे, मुकेश सोनवणे, कुमार झाल्टे, लक्ष्मीकांत झाल्टे ,संदिप सोनवणे, परशुराम पाटील, राधेश्याम पाटील यांनी शाळेला भेट देऊन पंचनामा करण्यात आला असून शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ मंडळी करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.