जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा श्रीगणेशा

डिसेंबर 26, 2025 8:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२५ । महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता गती येऊ लागली आहे. दरम्यान, अर्ज प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि भाजपकडून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

jalgaon manapa

महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधून अनिल अडकमोल यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. अडकमोल यांनी भाजपकडून एक आणि अपक्ष म्हणून दोन असे एकूण तीन अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. आरपीआय (आठवले गट) आणि भाजपच्या वतीने दाखल झालेला हा पहिलाच अधिकृत अर्ज असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Advertisements

आज दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवरून सुमारे २८० उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. हा आकडा पाहता येत्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now