गुन्हेजळगाव जिल्हा

धक्कादायक ! चाळीसगावच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । काही दिवसापूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेने अख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता चाळीसगाव मधून धक्कादायक घटना समोर आलीय.

चाळीसगाव नगर परिषदेचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर संध्याकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असतांना त्यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारमध्ये माजी नगरसवेक बाळू मोरे थोडक्यात बचावले असून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समोर आलेले आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button