---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

Fire : गणेश मार्केटमध्ये कापड दुकानांना भीषण आग, करोडोंचे नुकसान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२२ । शहरातील टॉवर चौकाजवळ असलेल्या केळकर मार्केट शेजारील गणेश मार्केटमध्ये साड्या आणि कपडा दुकानांना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत एक दुकान पूर्णतः खाक झाले असून इतर २ दुकानांना झळ पोहचली आहे. जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले असून करोडोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

IMG 20220312 012421 jpg webp

जळगाव शहरातील केळकर मार्केट नजीक असलेल्या गणेश मार्केटला रात्री दहाच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये गिरीश मोतीरामानी व राजेश मोतीरामानी यांच्या मालकीची सारिका साडी, सारिका टेक्स्टाईल आणि सारिका ड्रेस मटेरियल ही तीन दुकाने आगीत खाक झाली.

---Advertisement---

शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सारिका साडीयापासून आग सुरू झाली. आग इतकी भीषण होती की, आगीने आजूबाजूच्या दोन दुकानांना देखील आपल्या विळख्यात घेतले. आग लागताच नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे २ बंब लागलीच घटनास्थळी हजर झाले. यामुळे आगीचा वेग नियंत्रणात आणण्यात दलाला यश आले. सहा बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत वीज पुरवठा खंडित केला तर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी लक्ष ठेऊन होते.

जळगाव मनपातील अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, कर्मचारी फायरमन अश्वजित घरडे, नासिर अली शौकत अली, भिला कोळी, सोपान जाधव, नितीन बारी, तेजस जोशी, वाहन चालक युसुफ पटेल, निवांत इंगळे, संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी करोडोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पहा आगीचे थेट प्रक्षेपण :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1002532150621356/

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---