⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

ग्राहकांना विजेचा आर्थिक शॉक; वीज दर महागणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । कोळसा दरवाढीमुळे ग्राहकांवर १० ते ६० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. महावितरणच्या ग्राहकांना प्रति युनिट १० पैसे ते २५ पैसे जादा मोजावे लागणार असल्याने १०० युनिटपर्यंत १० रुपये, तर ३०० युनिटपर्यंत ६० रुपयांचा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

कोळसा आणि गॅसच्या किमती नवीन उच्चांक गाठत असताना, महाराष्ट्र वीज नियामकाने सर्व कंपन्यांना संपूर्ण राज्यासाठी वीज दर वाढवण्याची परवानगी दिली आहे. यासह, विक्रमी उच्च इंधन दरांचा हवाला देऊन उच्च वीज दरांना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या वाढत्या यादीत महाराष्ट्र सामील झाला आहे.

डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या काळात वीजखरेदीवरील वाढीव खर्च वसूल करण्यासाठी मार्च ते मे २०२२ या काळातील वीजवापरावर महावितरणच्या वीजग्राहकांवर इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहे. त्यामुळे वीज बिलात भर पडणार आहे.