जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची खऱ्या अर्थाने धावपळ सुरु होणार असून राजकीय वातावरण तापले आहे.

जळगावसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे आज 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत.

महापालिकेत इथे आहे व्यवस्था
निवडणूक प्रक्रियेला आज मंगळवारपासून सुरुवात होत असून जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या आणि अकराव्या मजल्यावर उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकारण्याच्या कामाला सुरुवात होईल. दोन ते तीन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी कमी असेल. पण नंतर ती वाढू शकते.









