जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । तालुक्यातील ढोली येथील बबन भाईदास पाटील, वैशाली बबन पाटील यांनी स्वमालकीच्या घरावर दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र त्याचे हप्ते थकविल्याने महिंद्रा रुलर हाऊसिंग कंपनीने घर सील केले होते. मात्र सील केलेल्या घरात पाटील कुटूंबियाने अनधिकृत रहिवास सुरू केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोली येतील बबन भाईदास पाटील, वैशाली बबन पाटील यांनी यांनी महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स जळगाव शाखेतून आपल्या ढोली येतील स्वमालकीच्या 600 चौरस फुट जागेवर दीड लाख रुपये 2015 साली कर्ज घेतले होते. कर्जाचा पहिला हप्ता जून 2015 मध्ये भरला त्यानंतर एकही हप्ता वेळेवर भरला नाही. त्यामुळे महिंद्रा कंपनीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे फायनान्शिअल अॅक्ट प्रमाणे केस दाखल केले होते. त्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी सदर घराचा ताबा ताबा घेण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार तामसवाडी मंडळ अधिकारी पाटील यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यावरून महिंद्रा रुरल हौसिंग कंपनीचे प्राधिकृत अधिकारी संदीप धनिराम सुतार, मनोज प्रकाश जाधव,
उदयन शिरीष पाटील, नितीन डिगंबरा सोनार, तुषार रविंद्र पाटील अशा लोकांच्या पथकाने 13 जानेवारी 2022 रोजी दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन घर ताब्यात घेऊन नियमाप्रमाणे सील केले होते. 9 फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी संदीप सुतार, कंपनीचे वकील अर्जून वानखेडे सदरचे घर चेक केला असता बबन भाईदास पाटील याने घराचे सील तोडून त्याचे परिवारासोबत घरात रहिवास करत असल्याचे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सील मी तोडले असून तुमच्याने काय होते ते करून घ्या असे उद्धट भाषेत उत्तर दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । पारोळा : तालुक्यातील ढोली येथील बबन भाईदास पाटील, वैशाली बबन पाटील यांनी स्वमालकीच्या घरावर दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र त्याचे हप्ते थकविल्याने महिंद्रा रुलर हाऊसिंग कंपनीने घर सील केले होते. मात्र सील केलेल्या घरात पाटील कुटूंबियाने अनधिकृत रहिवास सुरू केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढोली येतील बबन भाईदास पाटील, वैशाली बबन पाटील यांनी यांनी महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स जळगाव शाखेतून आपल्या ढोली येतील स्वमालकीच्या 600 चौरस फुट जागेवर दीड लाख रुपये 2015 साली कर्ज घेतले होते. कर्जाचा पहिला हप्ता जून 2015 मध्ये भरला त्यानंतर एकही हप्ता वेळेवर भरला नाही. त्यामुळे महिंद्रा कंपनीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे फायनान्शिअल अॅक्ट प्रमाणे केस दाखल केले होते. त्यावर जिल्हाधिकारी राऊत यांनी सदर घराचा ताबा ताबा घेण्याचे आदेश पारित केले होते. त्यानुसार तामसवाडी मंडळ अधिकारी पाटील यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यावरून महिंद्रा रुरल हौसिंग कंपनीचे प्राधिकृत अधिकारी संदीप धनिराम सुतार, मनोज प्रकाश जाधव,
उदयन शिरीष पाटील, नितीन डिगंबरा सोनार, तुषार रविंद्र पाटील अशा लोकांच्या पथकाने 13 जानेवारी 2022 रोजी दोन पंचांसमक्ष पंचनामा करुन घर ताब्यात घेऊन नियमाप्रमाणे सील केले होते. 9 फेब्रुवारी रोजी प्राधिकृत अधिकारी संदीप सुतार, कंपनीचे वकील अर्जून वानखेडे सदरचे घर चेक केला असता बबन भाईदास पाटील याने घराचे सील तोडून त्याचे परिवारासोबत घरात रहिवास करत असल्याचे आढळून आले. याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, सील मी तोडले असून तुमच्याने काय होते ते करून घ्या असे उद्धट भाषेत उत्तर दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.