जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । नुपुर शर्मा यांनी केलेल्या विधानाचे कायदेशीर कारवाई करण्यात यावी, व त्यात काही तथ्य आढळून आल्यास नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई अश्या मागणीचे निवेदन शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आले.
पवित्र इस्लाम धर्मात सर्वात जास्त महत्व, मान सन्मान व प्रेम हे अंतिम प्रेषित मोहम्मद सल्लाहु अलैही वसल्लम यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या पत्नी हजरत आयेशा सिद्दिका रजी यांना संपूर्ण मुस्लिम धर्मीय आपल्या आई पेक्षा जास्त मान सन्मान देतात. दि. 28 मे रोजी टाईम्स नाऊ या इंग्रजी चॅनेलवर ज्ञान वापी फाईल या चर्चेच्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील भाजप प्रवक्ता नुपुर शर्मा या महिलेने चर्चेदरम्यान अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अंतिम प्रेषित व त्यांच्या पत्नी यांच्याविषयी बदनामीकारक व खोटे विधान करून त्यांच्या पवित्र व आदर्श चारित्र्यावर शिंतोडे उडवत. सर्व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्या या विधानामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम 295 (अ ),153 (अ ),505 (2) अन्वये गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई असे निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी अध्यक्ष अयाज अली नियाज अली, इक्बाल वझीर, रशीद कुरेशी, अहेमद खान, सय्यद जावेद, फारुख तंवर, अफझल मनियार, नुर मुहंमद, नाझीम पेंटर, शेख शफी, मौलाना अशपाक रजा, मोहसीन मनियार, रफिक पटेल, शेख सदाकत, शेख नूर मोहम्मद उपस्थित होते.