जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील हरीविठ्ठल नगरातील मश्जिदच्या पाठीमागील भागात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाल्याची घटना ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. यात चार जणांमध्ये हातापायी होवून चापटा बुक्क्यानी मारहाण झाली. या घटने मध्ये रामानंदनगर पोलीसात परस्पर विरोधात तक्रार देण्यात आली आहे. यात उज्ज्वला अनिल सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुसेन तडवी आणि रशीदा तडवी दोन्ही रा. हरीविठ्ठल नगर यांच्या विरोधात तर सलमा हुसेन तडवी यांच्या फिर्यादीवरून उज्ज्वला सपकाळे आणि प्रियंका सपकाळे दोन्ही रा. हरीविठ्ठल नगर यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.