⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | नूतन मराठाचा ताबा घेण्यावरून पाटील आणि भोईटे गटात हाणामारी

नूतन मराठाचा ताबा घेण्यावरून पाटील आणि भोईटे गटात हाणामारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । मराठा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत संस्थेवर नरेंद्र अण्णा पाटील गटाचा हक्क ताबा असल्याचा निर्णय काल शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने दिल्यानंतर आज पाटील आणि भोईटे गटात वाद पेटला आहे.  यावेळी एका कारचे काच फोडण्यात आल्यानंतर येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

जळगाव जिल्हा विद्याप्रसारक मंडळ मर्यादीत या संस्थेच्या २०१५ साली झालेल्या निवडणुकीत नरेंद्रअण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय संपादन करून भोईटे गटाचे साम्राज्य खालसा केले होते. यानंतर मात्र भोईटे गटाने पुन्हा एकदा समांतर कार्यकारिणी स्थापन करून संस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यातून वाद झाले होते. यात दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरूध्द तक्रारी देखील दाखल केल्या होत्या.

संस्थेतील वादाची पार्श्‍वभूमि काहीच बदललेली नसतांना आणि पहिल्यांदा दिलेले आदेश निष्प्रभ झालेले नसतांना एकाच तहसीलदाराने एकाच मुद्यावर दोन वेगळे आदेश का दिलेत ? अशी बाजू पाटील गटातर्फे न्यायायापुढे मांडण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने पुन्हा या संस्थेवर नरेंद्र पाटील यांच्या गटाचेच संचालक मंडळ वैध असल्याचा निकाल काल दिला.

यानंतर आज पाटील गटाचे संचालक कार्यकारिणीचा ताबा घेण्यासाठी गेले. तेव्हा भोईटे आणि पाटील गटामध्ये वाद झाला. यात एका इनोव्हा कारचे मागील बाजूचे काच फोडण्यात आले. दोन्ही गटांमधील वाद विकोपाला जाण्याआधीच पोलीसांनी नूतन मराठामध्ये धाव घेतल्याने अनर्थ टळला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नूतन मराठामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/2983377901889993/

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.