जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली जवळ असलेल्या ईदगाह कॉम्प्लेक्समधील एका टायर दुकानाशेजारी कचऱ्याला बुधवारी सकाळी 10:30 च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानातील टायर आणि रबरी साहित्य आगेच्या तावडीत सापडल्याने हवेत दूरवरून धुराचे मोठ-मोठे लोळ दिसून येत आहेत.
अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या ईदगाह मैदानाजवळील एका टायर दुकानालगत असलेल्या कचऱ्याला बुधवारी सकाळी 10:30 च्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणात आग मोठ्या प्रमाणात पसरून दुकानातील टायर आणि इतर साहित्य आगीच्या तावडीत सापडले. दुकानातून उठत असलेले धुराचे लोळ दूरवरून दिसून येत असून घटनास्थळी जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाने धाव घेतली आहे.
दरम्यान, अद्याप अग्निशमन दलाचे २ बंब रिकामे झाले असून तिसरा बंब मागविण्यात आला आहे. आग कशामुळे लागली आणि आगीत किती नुकसान झाले हे अद्याप समजून आलेले नाही. एमआयडीसी पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून पुढे उभ्या असलेल्या तरुणांना आणि नागरिकांना दूर थांबण्याचे आवाहन पोलिसांनी केले. आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नगरसेवक रियाज बागवान देखील घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.