जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । अमळनेर तालुक्यातील किरकोळ व घाऊक अनुदानित विक्रेत्यांची येथील पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम 2022 खत नियोजनासाठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगांव, कृषी अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांनी मार्गदर्शन केले.
ई पॉस खत साठा याबबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी बांधवांनी खत भरून ठेवणे कमी रा.खत विक्रेत्याकडून व कृषी विभाग काढून आव्हान करण्यात आले. तसेच ई पांस मशील मोबाईल डेस्कटॉप व्हर्जन चा वापर करून खत विक्री करणे संदर्भातील माहिती देण्यात आली. शिवाय जमीन सुपीकता, निर्देशांक व जमीन आरोग्य पत्रिका आधारित खत वापर कसा करावा या बाबत योग्य पद्धतीने सांगण्यात आले. कृपक अप नुसार खत वापर नियोजन व वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पिक निहाय खत मागणी बाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद जळगांव, तालुका कृषी अधिकारी, तालुका कृषी निविष्ठा विक्रेते संघटना, किरकोळ व घाऊक अनुदानित खत विक्रेते उपस्थित होते.