जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात विविध पदांसाठी पदभरती निघाली आहे. या भरतीसाठीचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. FDA Maharashtra Bharti 2024
त्याप्रमाणे जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील त्यांना अन्न व औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येतील. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. 23 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान अर्ज दाखल करता येतील. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. FDA Maharashtra Recruitment 2024
रिक्त पदाचे नाव :
वरिष्ठ तांत्रिक सहायक – 37
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब -19
भरतीसाठी अवाश्यक पात्रता:
वरिष्ठ तांत्रिक सहायक – : (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब -: फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव
वयाची अट: 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपयांचे शुल्क भरावं लागणार आहे.
इतका मिळेल पगार?
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ पदावर निवड झालेल्या उमदेवारांना 38600-122800 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. तर, वरिष्ठ तांत्रिक सहायक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 35400-112400 वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा