विष प्राशन करून पिता-पुत्राची आत्महत्या ; जळगावातील धक्कादायक घटना

मार्च 11, 2021 10:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । जळगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. विष प्राशन करून पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना आज जळगावातील आदर्शनगरमध्ये घडलीय. दीपक रतीलाल सोनार (वय ६२) व परेश दीपक सोनार (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे.

crime

आदर्श नगरात दीपक सोनार हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून ते गत दोन दिवसांपासून त्यांची पत्नी कोरोना बाधीत झाल्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीपक सोनार यांची मुलगी व जावई त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी उपचार सुरू असणार्‍या आईची विचारपूस केली. यानंतर सायंकाळी मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आली असता दीपक सोनार व त्यांचा मुलगा परेश  यांचे मृतदेह त्यांना आढळून आले.

Advertisements

त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले असता विष प्राशन केल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांनी पंचनामा करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now