---Advertisement---
गुन्हे चोपडा

ज्या तरुणासोबत पाच वर्ष संबंध ठेवले, त्याला आधीच होती सहा अपत्य ; सत्य समोर येताच तरुणीला बसला धक्का

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य झाली असताना देखील तरुणाने २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळेवेळी अत्याचार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या पाच वर्षांच्या काळात पीडितेलाही तीन मुलं झाली.  याप्रकरणी प्रकरणी पतीसह सात संशयीतांविरोधात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 1 jpg webp webp

ही घटना चोपडा तालुक्यात समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील तरुणाचे आधीच लग्न झालेले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला एक दोन नव्हे तब्बल सहा अपत्य होती. तरी देखील त्याने एका २९ वर्षीय तरुणीला २०१६ ते २०२१ या काळात वेळेवेळी लग्नाचे आमिष देत तिच्यावर अत्याचार केले.

---Advertisement---

या पाच वर्षांच्या अत्याचारातून पीडितेला देखील ३ मुलं झाली आहेत. आपली दिशाभूल करुन षडयंत्र, कटकारस्थान रचून हे सगळे केले गेल्याच लक्षात आल्यावर तरुणीला मोठा धक्का बसला. याबाबत पिडीतेने न्यायालयात धाव घेत तक्रार केलीय.

या तक्रारी नुसार या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये बुधवारी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---